समाधान वधू-वर सूचक व समुपदेशन केंद्र

मराठी  विवाह संस्था

समाधान वधु -वर केंद्राची स्थापना २००० साली झाली. लोक जागृती ग्रामीण  विकास मंडळ लहान या नोंदणीकृत स्वयंसेवी  संस्थेमार्फत हे केंद्र चालते.
हे एक विश्वासू केंद्र आहे.मराठवाड्यातील २- ३ जुन्या वधू  वर केंद्रापैकी हे एक केंद्र आहे. मराठा सर्व जातीतले लग्न न झालेले, सर्व वयोगटातील घटस्फोटित,  ,विधुर, विधवा, आंतरजातीय वधू वरांची  नोंद केली  जाते.

दर वर्षी वधु-वर परिचय मेळावे घेतले जातात.लवकर लग्न जमवण्यास  मदत व्हावी म्हणून मराठा समाजाचे स्वतंत्र मेळावे व सर्व समाजाचे मिळून वेगळे मेळावे घेतले जातात.वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती व बातम्या देउन मेळाव्याची माहिती दिली जाते. मेळाव्यास  उपस्थित राहिल्यामुळे लग्न लवकर जमण्यास मदत होते. दानशूर व्यक्तींना अत्यंत गरीब वधु वरांचे लग्न  लावून देण्याचे आवाहन केले जाते. एकदा जमलेले लग्न दीर्घकाळ टिकावे हा केंद्राचा हेतू आसतो.

लग्नाची संख्या महत्वाची नसून लग्न चांगल्या अनुरुप ठिकाणी व दीर्घकाळ टिकले पाहिजे असे केंद्राला वाटते.
लग्नापुर्वी व नंतर समुपदेशन आवश्यक असेल तर तत्पर सेवा दिली जाते. आपण आमच्या कडे नोंदणी करून खात्री करावी.

Find your Life partner with us ........